“आतंकवादियोंने बंबईपे हमला किया, आतंकवादियोंको किसने मारा?
NSG के लडकोंने... NSG के लडके कौन थे? कहां के थे?
बिहार के थे, उत्तरप्रदेश के थे, बाकी हिंदुस्थान के थे..
उस समय नही बोला के भैया बिहार के लोगोंको भगाव यहां से,
उस समय बिल्कुल शांत था...
आतंकवादियोंको मारने आये है, हमे बचाने आये है भैया तो ठिक है,
बिहार के लोग है, कुछ मत बोलो...”
हे विधान केलंय राहुल गांधींनी, हेच विधान अबू, अमर, लालू, मुलायम यांनी केलं असतं तर?
महाराष्ट्रातले तमाम राजकारणी, प्रसारमाध्यमं त्यांच्यावर तुटून पडली असती.
त्यामुळेच राहूल गांधीं नशीबवान आहेत असं मी म्हणालो.
ज्या कुत्सितपणे खासदार राहुल गांधी यांनी हे विधान केलंय, त्यानं सुजाण मराठी माणूस निश्चित दुखावला गेलाय.
तुम्ही सध्याच्या राजकारण्यांपेक्षा वेगळे आहात असा समज सगळीकडे पसरत होता, तो दूर करायची एवढी कसली घाई ? आणि त्यासाठी २६/११ सारख्या घटनेचा वापर करणं याला दुर्दैव म्हणावं का तुमच्या (अपरिपक्व) राजकारणाचा भाग?
देशावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला, त्याच्या जखमा अजूनही मनावर ताज्या आहेत.
मुंबईत उत्तरभारतीय राजकारण्यांच्या अरेरावीला विरोध, आणि देशावरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला यांचा असा संबंध लावणं हे फक्त स्वार्थी राजकारण्यांनाच जमू शकतं.
बहुतांश राजकारणी मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यात पटाईत असतात असं सर्वसामान्य जनतेचं मत, या थिल्लर राजकारणात किमान २६/११ तरी आणू नका.
राहुलजी, तुम्ही म्हणालात महाराष्ट्रात भेदभाव होतोय, त्याविरोधात मी बोलणारंच, शांत बसणार नाही... आनंद आहे, खरोखरच देशात काहीतरी चुकीचं होत असेल तर तुमच्यासारख्यांनी बोलालायच हवं. पण ज्यावेळी मुंबईत राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं, त्याचवेळी तुम्ही का नाही बोललात?
काँग्रेसमध्ये तुमच्या शब्दाला किती महत्त्व आहे हे सारा देश जाणतो. मनसेचं आंदोलन चुकीचं आहे, हे तुम्हाला माहित होतं तर त्यावेळी सरकार तर तुमचंच होत ना! मग का नाही तुम्ही दबाब आणलात?
खरंतर असं काही तुम्ही त्यावेळी बोलला असतात तर मराठी माणूस नाराज झाला असता आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला असता हे तुम्हाला चांगलं माहित होतं, म्हणूनच तुम्ही सोयीस्करपणे गप्प राहणं पसंत केलंत.
येत्या ५ वर्षात महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका नाहीत, त्यामुळे आता महाराष्ट्राबद्दल काहीही बोलायला तुम्ही मोकळे झालात. आणि महाराष्ट्राला राष्ट्रप्रेमाचे धडे शिकवायला बिहारपेक्षा चांगली जागा तुम्हाला कुठे मिळाली असती?
राहुलजी, सगळा मराठी माणूस सगळ्या उत्तरभारतीयांच्या विरोधात कधीच नव्हता, तसा तो विनाकारण विरोधात जाणारही नाही. पण मनसे-काँग्रेसच्या मतांच्या राजकारणात तसं चित्र मुद्दाम उभं केलं गेलं.
राज्यातल्या निवडणुका संपल्या तरी विचारांचा तो टेम्पो अजुनही कायम आहे कारण देशात कुठे ना कुठे निवडणुका चालूच असतात आणि हा मुद्दा मतं आणि सत्ता मिळवून देतो हे तुम्हा राजकारण्यांना चांगलं कळतं.
मतांच्या हव्यासापोटी आपण तमाम महाराष्ट्राचा, २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांचा अपमान करतोय याचं भान किमान तुम्ही तरी ठेवायला हवं होतं.
तुमच्या पणजोबांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती लिहिली तुम्ही तोच चष्मा घालून महाराष्ट्राकडं बघताय असं तुमचं बिहारमधलं बोलंण होतं. देशाचा इतिहास महाराष्ट्राशिवाय पूर्ण होत नाही हे विसरु नका. देशाच्या भविष्याला दिशा देण्याची जबाबदारीही महाराष्ट्र
No comments:
Post a Comment